Monday, 28 September 2015

Bsc for Teachers

see the pdf

अनमोल सुविचार

अनमोल सुविचार


अनमोल सुविचार *


दोन शब्द...
'अनमोल सुविचार' हे असे पुस्तक की, ज्यात 1700 हून अधिक सुविचारांचा संग्रह केलेला आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात विविध विषयानुसार सुविचार संग्रहण व संकलन केले आहे. उदा. शिक्षण, विद्या, ज्ञान, पुस्तक, देश, .... असे 29 विषय आहेत. सुविचार हे दीपस्तंभासारखे असतात. याच्या वाचनाने प्रत्येकाच्या मनात सकारात्मक विचार,चैतन्य, उत्साह निर्माण होतो. आपल्या परिवारातील सृजनशील शिक्षक श्री गुरुनाथ राजमाने यांनी हे पुस्तक संकलित केले आहे.

Saturday, 5 September 2015

SARAL INFORMATION

मोबाईल च्या माध्यमातून कागदपत्रे  स्कॅन( १ mb साईज ) कसे करावे 


मित्रहो आपल्याला सरळ प्रणालीमध्ये आपली कागदपत्रे स्कॅन करावयाची आहे.आपण खालील  पद्धती चा वापर करून  १ MB साईज  मध्ये स्मार्ट  मोबाईल वर स्कॅन करू शकतो एकदम मोफत.....
.
१)प्रथम आपण प्ले स्टोअर वरून   camscanner  हे APPS घ्या (.इतर ही घेऊ शकता .)
२) आपल्या मोबाईल वरून आपल्या सर्व  लागणार्या कागद पत्रांचा फोटो काढा .फोटो काढताना तो क्लिअर यईल अशी काळजी घ्या .शक्यतो ५ MP कॅमेरा ने काढा म्हणजे १ mb साईज मध्ये येईल .जर कमी MP चा असेल ते क्लीअर येणार नाही  ,व ८  MP  चा असेल तर आपल्याला  CROP चा पर्याय आहे, लांबून फोटो काढा व कडेचा भाग  crop ( कट )करा  .१३ MP चे सांगता येत नाही .
३) हे फोटो  camscanner मध्ये घेऊन स्कॅन करा .व सेव करा.सेव करताना  JPG image सेव करा . पुन्हा मोबाईल वरून pc ला किंवा laptop ला घेऊ शकता .अगदी मोफत ......
आणखी दोन तीन पर्याय आहेत .पण हा सोपा व जवळचा  पर्यायआहे.  
धन्यवाद ....



 मित्रहो .....
           आपल्याला सरल प्रणाली( शाळा पोर्टल ) मध्ये १ ते ८ चे  वेळा पत्रक  भरावयाचे आहे .पण काय होते काही वेळा सर्व विषय भरूनही सेव  होत नाही. वेळापत्रक बघून भरल्यामुळे तासिका चुकण्याची शक्यता असते .काहीवेळा आपल्याकडे उपलब्ध असलेले वेळापत्रक चुकीचे असण्याची शक्यता असते . त्यामुळे एरर दाखवते .खालील गोष्टी लक्षात घेतल्या तर वेळापत्रक लगेच भरले जातात .कारण एका विषयाची संख्या जरी चुकली तर माहिती सेव होत नाही .
१) फक्त तासिका तक्ता हातात घ्या.सर्व वर्गाची वेळापत्रके घेऊ नका  (.ईयत्ता निहाय व विषय निहाय अभ्यासक्रम २०१२ चा ५० तासिका तक्ता  )
२)उदा पहिली ला ५० तासिकेमध्ये १८ मराठी ,इंग्रजी ६,गणित १२ कला ४,कार्यानुभव ५,शा.शिक्षण ५ अशा तासिका आहेत .
३)१८ मराठी तासिका सोमवार ते शनिवार अशा सलग आडव्या क्रमाने भरायच्या .त्यानंतर बाकीचे विषय घ्यायचे आडव्या क्रमाने पण मोजून बरोबर द्यायचे .मात्र शनिवारी पहिला तास शा शिक्षण चा घ्या . त्या बदल्य्यात खाली मराठी घ्या( बदल करा ) .
४)या पद्धतीने इतर इयत्ता ची वेळापत्रके भरून घ्या .त्यामुळे वेळापत्रके पटकन भरली जातात .व वेळ वाचतो .या मध्ये विद्यार्थ्याची मानसिकतेचा विचार  करून आपण थोडाफार बदल ही करु  शकता  .
(हे माझे वैयक्तिक मत व अनुभव आहे. आपण आपल्या स्तरावर बदल करू शकता .)
धन्यवाद


Friday, 28 August 2015

Paperless Work

For this blog to help for paperless work for our cluster Jogmodi Tal peint with the help of this blogs
This blog also created by Asst.Teacher Mr. GHANSHYAM ARJUN NIKALJE Z P Pri,.School Jogmodi.